Vanchit News

भेडसगावजवळ बिबट्याचा दोन बछड्यांसह वावर .वंचित न्यूज चॅनल : दिनांक :- 6/7/2022 . शाहुवाडी तालुका प्रतिनिधी :- सखाराम कांबळे बांबवडे / भेडसगाव जवळच्या निजामवाडी येथे मंगळवारी पहाटेपासून मादी बिबट्याचा बछड्यांसह वावर आहे. बिबट्यांनी वाडीतील एका कुत्र्याचा फडशा पाडला आसून पहाटे 5 वाजता एक शेळीला लक्ष्य करुन तीला फरफटत नेले दरम्यान जवळच असलेल्या स्मशान शेडजवळ दोन बछड्यांसह बिबट्यांनी ठीया मारला होता.काही दिवसांपासून वारणा नदीकाठी बिळाशी पुलावर बिबट्यांचा वावर होता मंगळवारी पहाटे 5 वाजता मादी बिबट्या दोन बछड्यांसह निजामवाडीत आली. सुरुवातीला एका भटक्या कुत्र्याचा फडशा पाडून त्यांनी शेजारी असलेल्या आनंदराव पाटील यांच्या शेडमधील शेळीस लक्ष्य केले . शेळी फरफटत नेऊन जवळच असलेल्या स्मशान शेडजवळ ठिय्या मारून पिलांसह त्यावर ताव मारला. ग्रामस्थांनी माहिती दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत मादी बिबट्याने बछड्यांसह वाडीशेजारच्या शेतात धाव घेतली परिसरात वस्ती असून शेतीही शेजारीच असल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसभर वनविभागाचे कर्मचारी बिबट्यांचा शोध घेत होते दरम्यान, दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.


Vanchit News