Vanchit News

इंदापूर मध्ये वन कर्मचाऱ्याचा अंगावर झाड पडून मृत्यू,बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणाचा झाला कळस.



वंचित न्यूज चॅनेल: दि२३,पुणे जिल्हा प्रतिनिधी सतीश जगताप काल इंदापूर मध्ये बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे वन विभागाची परवानगी न घेता विद्या प्रतिष्ठान कडून मुख्य राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुळे चौका जवळ असणाऱ्या वृक्षांची वृक्षतोड मैल मजुरांकडून करण्यात येत होती यामध्येकळस येथील वन कर्मचारी ज्ञानदेव बाबुराव ससाने वय (55)हे मोटरसायकल वरून महामार्गाच्या दिशेने निघाले होते अचानक झाड कोसळल्याने त्यांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. सकाळी सात वाजताच मैल मजुरांना घेऊनया ठिकाणी वृक्षतोड चालू होती, परंतु कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी दक्षता न घेतल्यामुळे हा बळी गेला आहे असे ससाने यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर या ठिकाणी तात्काळ हलवण्यात आले, परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आणून ठेवला या घटनेला सर्वस्वी बांधकाम विभागाचे उपअभियंता व कर्मचारीच जबाबदार आहेत अशा प्रकारचा सुर नातेवाईकां मधून निघत होता. यानंतर तात्काळ उपअभियंता दीपक भोसले यांच्याशी संपर्क नातेवाईकांनी केला त्यावेळेस त्यांनीउडवा उडवी ची उत्तरे दिली. नंतर बराच वेळ पत्रकारांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याही प्रकारचा पत्रकारांना प्रतिसाद दिला नाही. मृत ससाने यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्वतः जातीने या गोष्टींमध्ये लक्ष घालावे आणि अशा निष्काळजी पणे वागणाऱ्या अधिकारी ,व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे !असेही मृताच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे इंदापूरच्या बांधकाम विभागातील अशा मंगरूर अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कार्यवाही व्हावी याकरिता आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोतअसेही नातेवाईकांनी सांगितले.






Vanchit News