कृषी दुतांनी पटवून दिले वनस्पती वाढ नियामक म्हणजेच पी जी आर (प्लांट ग्रोथ रेगुलेटर) चे महत्त्व पटवून दिले.
वंचित न्यूज चॅनेल : नीरा नरसिंगपूर: दि.29 जुलै 2022. पुणे जिल्हा प्रतिनिधी : सतीश जगताप. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर (पीजीआर) ही रसायने आहेत जी झाडांच्या वाढीमध्ये बदल करण्यासाठी वापरली जातात. जसे की शाखा वाढवणे, अंकुरांची वाढ रोखणे, परतीचा बहर वाढवणे, जास्तीचे फळ काढून टाकणे किंवा फळांची परिपक्वता बदलण्येसारखे महत्त्वाचे काम पी जी आर सक्षमपणे निभावते असे मार्गदर्शन कृषिदूत पृथ्वीराज देशमुख,शिवम शेंडे,प्रसाद काळे, प्रसन्नजीत देशमुख ,गौरव वाघ ,शिवराज देशमुख ,शिवतेज शेंडगे, वैभव देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले. या प्रात्यक्षिकेच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे,कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस एम एकतपुरे ,कार्यक्रम आधिकारी प्राध्यापिका एस एल मसकर व प्राध्यापक एस आर आडत (सहाय्यक प्राध्यापक मृदाविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.