Vanchit News

वंचित बहुजन आघाडीआजरा व वंचित बहुजन महिला आघाडी आजरा या तालुका कमिटी यांची संयुक्त बैठक संपन्न.वंचित न्यूज चॅनेल : - वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या कोल्हापूर जिल्हा प्रभारी माननीय डॉ. क्रांतीताई सावंत यांचा आज संपर्क दौरा झाला. आजरा येथील सुसज्ज अशा नुतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉ.क्रांतीताई सावंत यांचे हस्ते करनेत आले. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडी आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांचा संपर्क मेळावा दक्षिण कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी माननीय डॉ. क्रांतीताई सावंत मॅडम यांनी उपस्थित सर्वांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.त्याचबरोबर बाळासाहेब समजून सांगताना त्यांच्या भूमिका, वंचित समाजा प्रति असणारी निष्ठा, त्यांचे वंचितांना सत्तेत बसवण्याचे स्वप्न या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. पदाधिकाऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांना संघटन कौशल्य कसे असावे यासंबंधी मनमोकळी चर्चा केली. यावेळी महिला आघाडी उपाध्यक्ष रूपाली कांबळे, तसेच महिला आघाडी जिल्हा महासचिव उज्वला खवरे, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गौतम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजरा तालुका मार्गदर्शक अजय देशमुख उपाध्यक्ष संदीप कांबळे विलास कांबळे, महासचिव,सर्जेराव कांबळे सचिव प्रविण कष्यप, कोषाध्यक्ष अंकुश कांबळे,निरीक्षक गणपती कांबळे आयटी प्रमुख,सागर कांबळे संघटक,अविनाश कांबळे संघटक,मंगेश कांबळे,महिला तालुका अध्यक्ष प्रिती कांबळे सचिव,वैशाली कांबळे आयटी प्रमुख, विद्या कांबळे संपर्क प्रमुख भाग्यश्री कांबळे सहसचिव, लता कांबळे आयटी प्रमुख,अश्विनी कांबळे सचिव, कांबळे तसेच जिल्हा कमिटी मेंबर रशीद शिकलगार जिल्हा उपाध्यक्ष, महादेव कांबळे जिल्हा सचिव.व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मेळाव्यास तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिताचे आभार संपर्क प्रमुख भिकाजी कांबळे यांनी मानले. गौतम कांबळे, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आजरा, प्रिती कांबळे, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडीआजरा.


Vanchit News