शासनाकडून मिळणाऱ्या योजना राबवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करनार-सतिश माळगे.
वंचित न्यूज चॅनेल : - कागल तालुका प्रतिनिधी: सतप्पा कांबळे. सीमाभागातील शोषीत,वंचीत,मागासलेल्या दलीत समाजाला केंद्र दि.०२/०८/२०२२ . विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संविधानानुसार दलित शोषीत वंचित समाजाचा अर्थीक स्थर उंचववा म्हणून केंद्र शासन तसेच राज्य शासन अनेक विविध योजना राबवीत असते पन या सर्व योजना तळागाळातील वंचीत घटकापर्यंत पोहचत नाही त्याला निपाणी सिमाभग अपवाद नाही अनेक वर्षे कर्नाटक,महाराष्ट्राच्या सिमावादात अडकलेला निपाणी सीमाभागातील दलीत,शोषीत, वंचित समाजातील घटक या सर्व योजनांच्या प्रतिक्षेत आहेत. याचा योग्य लाभ या घटकाला मिळत नाही तसेच नोकरीसाठी सिमाभागातून महाराष्ट्रामध्ये नोकरी करणाऱ्या अनुसूचित जातीतील नोकर वर्गाला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अनेक अडचणी चा सामना करावा लागतो. तसेच निपाणी परिसरातील पूरग्रस्त भागाला कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळत नाही. तसेच मागासवर्गीय समाजातील महिला बचत गटांना केंद्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजनाचा लाभ मिळावा. या सर्व प्रश्नांनसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांची कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते सतिश दादा माळगे,अमर दाभाडे,प्रविण सौंदलगे यांच्या सिस्टमंडळाने भेट घेतली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली .केंद्र सरकार कडून मिळणाऱ्या सर्व योजना सीमाभागातील दलित मागास घटकातील समाजाला योजनांच्या माध्यमातून योग्य तो न्याय मिळवून देवू असे अशवासन यावेळी या सिस्ट मंडळला ना:रामदासजी आठवले यांनी दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे करवीर चे प्रदीप ढाले,निलेश कांबळे,रंजीत कांबळे,रतेश कांबळे,चंदर कांबळे उपस्थित होते.