निमगाव केतकी - निमगाव केतकी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे हे मागील बारा वर्षा पासुन सामाजिक जाणिव ठेवुन गरजु मुलींच्या शिक्षणाचे काम करत आहेत ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजीमंञी व इंदापूरचे आमदार दत्ताञेय भरणे यांनी केले.
वंचित न्यूज चॅनेल : उप संपादक - सतीश जगताप आज निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयात आज नरसिंह प्रतिष्ठान च्या वतीने साविञीबाई फुले दत्तक योजनेतुन शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या दोनशे मुलींना शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रारंभा श्री भरणे यांच्या हस्ते व पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, डाॕ.अविनाश पाणबुडे, सरपंच प्रवीण डोंगरे, तात्यासाहेब वडापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.या वेळी भरणे बोलत होते. या वेळी भरणे यांनी विद्यालयाच्या सांस्कृतिक हाॕलसाठी पंधारा लाख रुपये देण्याची घोषणा केली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, संस्थापक दत्ताञेय चांदणे, माजी उपसरपंच सचिन चांदणे यांनी उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी प्राचार्य श्री चव्हाणसर, तंटामुक्तीचे अध्यक्ष अतुल मिसाळ, बाबासाहेब भोंगसह विविध क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.