Vanchit News

पिंपरी बुद्रुक येथे बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी भीमशक्ती या सामाजिक संघटनेची स्थापना माननीय श्री.युवराज मामा पोळ यांच्या हस्ते करण्यात आली.



वंचित न्यूज चॅनेल : निरा नरसिंहपुर, दिनांक : 9 प्रतिनिधी:सतिश जगताप पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी बहुजनांच्या न्याय, हक्कांसाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी भीमशक्ती या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली. संस्थेचे इंदापूर तालुका अध्यक्ष युवराज मामा पोळ आणि इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्याच्यानंतर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष हे माननीय युवराज मामा पोळ हे होते. त्याचप्रमाणे सिंहा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री. दादासाहेब पोळ तसेच भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुक्याचे उपाध्यक्ष माननीय श्री.विजय नाना साळुंखे यांचे प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी बुद्रुक येथील भीमशक्ती या संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष माननीय नबीलाल शेख, उपाध्यक्ष इस्माईल शेख, उपाध्यक्ष माननीय आयुब शेख, कार्याध्यक्ष माननीय नवनाथ गायकवाड, सचिव माननीय अण्णा सूर्यवंशी, खजिनदार गफार शेख, प्रसिद्धीप्रमुख करीम शेख, मार्गदर्शक विजय सूर्यवंशी, सहसचिव माननीय बापू कांबळे,सह खजिनदार माननीय अहमद शेख, तसेच इंदापूर तालुक्यातील भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे पिंपरी गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम अतिशय छान आणि सुरेख अशा पद्धतीने पार पडला गेला. या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या द्वारे आपण तळागळातील लोकांच्या कोणत्याही असणाऱ्या अडचणी सोडवणार आहे. आपल्या गोरगरीब, दलित लोकांवर अन्याय व अत्याचार होणार नाही याच्यासाठी आपण या संघटनेच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एक खंबीर साथ व योग्य न्याय मिळवण्यासाठी तसेच समाजामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या संघटनेद्वारे मदत करणार असल्याचे ग्वाही माननीय श्री. युवराज मामा पोळ यांनी आपल्या भाषणामध्ये दिली. बऱ्याच कार्यकर्त्यांचे आणि उपस्थितांची भाषणे झाली. शेवटी भोजनाचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम संपला असे अध्यक्षांनी जाहीर केले.






Vanchit News