Vanchit News

गोंदी वझरेचे सरपंच रणजीत वाघमोडे, यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदि या ठिकाणी कुस्तीचे भव्य मैदान संपन्न.वंचित न्यूज चॅनेल : नीरा= नरसिंहपुर-दि.7 ऑगस्ट 2022. उप-संपादक सतिश जगताप गोंदी- वझरे गावचे युवा नेतृत्व माननीय रणजीत वाघमोडे यांच्या वाढदिवसा निमित्त कुस्त्यांचे भव्य मैदान गोंदि या ठिकाणी घेण्यात आले या मैदानावरती अनेक महाराष्ट्रातील मल्लांनी आपली हजेरी लावली होती त्याचबरोबर अनेक नामांकित वस्तादही या मैदानाला भेटी देत होते. या मैदानावरती शेवटची कुस्ती. पैलवान माऊली कोकाटे ,(सराटी) वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा आखाडा पुणे विरुद्ध पैलवान संतोष जगताप (सरकोली) वस्ताद कैलासवासी दत्ता आप्पा वाघमारे यांचा पट्टा शिवनेरी तालीम अकलूज या दोघांमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली, यामध्ये माऊली कोकाटे यांनी संतोष जगताप यांच्यावरती विजय मिळवला. सकाळ पासूनच वातावरणा मध्ये पावसाचे चिन्ह दिसत होते परंतु, पावसाने उघडीप दिल्यामुळे साधारणता या ठिकाणी सर्वच कुस्त्या लावल्या गेल्या. या मैदानावरती रावसाहेब मगर यांनी मानाचा फेटा रणजीत वाघमोडे ,यांना बांधून परंपरा कायम चालू ठेवावी ,असे मैदानावरती रावसाहेब मगर यांनी वक्तव्य केले. या मैदानावरतीपोस्टर वरील कुस्त्या कालीचरण सोलंकर(टाकळी) विरुद्ध दशरथ तामखडे, तालीम (व्याहाळ) या कुस्तीमध्ये कालीचरण सोलंकर विजय ठरला,तसेच पैलवान भैया डांगे (गोंदी) विरुद्ध दादा जाधव ,(निमगाव केतकी) या कुस्तीमध्ये भया डांगे यांनी दादा जाधव वरती विजय मिळवला.पैलवान आर्यन देशमुख गोंदी विरुद्ध पैलवान सागर पाटील (कोल्हापूर) या कुस्तीमध्ये आर्यन देशमुख (गोंदी) यांनी विजय मिळवला. मा.नामदार, हर्षवर्धन पाटील साहेब यांनीही कार्यक्रम स्थळी भेट दिली या भागामध्ये रणजीत वाघमोडे यांच्या माध्यमातून युवा वर्गाला एकत्रित करून मोठ्या प्रमाणावरती सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम रणजीत बापू वाघमोडे यांच्यामार्फत होत असून आपण तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारची ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी बोलताना दिली लाखेवाडी नरसिंगपू व बावडा याजिल्हा परिषद गटाच्या व परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून ,या सरकार मधून आपण मोठ्या प्रमाणा वरती निधी उपलब्ध करून या भागाचा विकास पुढे करणार असल्याचे नामदार हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी श्री विलास बापू वाघमोडे पंचायत समिती माजी सभापती,माननीय भैयासाहेब पाटील,शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक अण्णाा काटे,अमर भैया जगदाळे, सराटी गावचे सरपंच बापू कोकाटे ,टनुचे सरपंच शितल भैया मोहिते,नरसिंगपूरचे माजी सरपंच अण्णासाहेबब काळे, तसेच टेंभुर्णीचे उद्योगपती नागाभाऊ खटके,(पंचायत समिती सदस्य) प्रदीप मामा जगदाळे,वस्ताद अण्णासाहेब गायकवाड (गार अकोले),रोहित जगदाळे सराटीमयूर घोगरे गणेशवाडी, संजय बापू बोडके, (संचालक निरा भिमा ,कारखाना .)निलेश बोडके युवा नेतृत्व (पिंपरी बुद्रुक) आदी मान्यवर उपस्थित होते.


Vanchit News