वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या पार्श्व भूमीवरं बावडा परिसरात पोलिसांची बालक जनजागृती मोहीम.
वंचित न्यूज चॅनेल : इंदापूर: दि.25 ऑगस्ट 2022 उप-संपादक -सतिश जगताप. बाल लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनेचे प्रमाण पाहता शाळा स्तरावरती विद्यार्थ्यांचे जनजागृती करण्याचे कामबारामती निर्भया पथकाने श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावडा, नरसिंहपुर,आसबे वस्ती, खंडोबा वस्ती, या शाळेला भेट दिली. व तेथे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळामध्ये लहान मुलावरील घडणारेे अत्याचाराचे गुन्हे हे मोठ्या प्रमाणावर घडत आहेत म्हणून विद्यार्थ्यांनाया गुन्ह्य संदर्भात समाजातील लोकांकडून होणारा चांगला स्पर्श, वाईट स्पर्श तो कोण करतो,लहान मुलांवरील अत्याचाराचे गुन्हे घडतात, ते कसे घडतात त्यासाठी काय करावे, काय करू नये स्वतःची काळजी मुलांनी कशी घ्यावी आई-वडिलांना प्रत्येक गोष्टीची माहिती द्यावी,अशी माहिती देऊन मुलांना निर्भया पथकाची ओळख करून दिली पोलीस काका ,पोलीस दिदी, असे समजून मुलांना हस्ते खेळते वातावरणात आनंदी जीवन जगावे घाबरू नये,अशी माहिती दिली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, कांबळे सर ,पारडे सर ,व शाळेचा शिक्षिका साळुंखे मॅडम निर्भया पथकाची महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे, अंजली नागरगोजे ,माया भोईटे ,उमा कोकरे ,रूपाली थोरात, पोलिस आमलदार सुनील धागाटे, प्रवीण अभंग, तसेच महिला छाया सरड, व महिला दक्षता कमिटी इंदापूरच्या सदस्या ,अनिता खरात असे उपस्थित होते बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी नागनाथ पाटील व त्यांची टीम अतिशय चांगले काम करत असल्यामुळे या भागातील लोकांमध्यें पोलीस प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.