Vanchit News

माळशिरस तालुक्यातील माळखांबी या गावातील दलित युवकावर होत असलेल्या अत्याचाराचा केला जातोय काही भास्म्या झालेले चिरीमिरीवाले पत्रकार करत आहेत बाजारपणा.



वंचित न्यूज चॅनेल : अकलूज ,.दि.०३/०९/२०२२ उपसंपादक -सतीश जगताप माळसिरस तालुक्यातील माळखांबी या गावांमध्ये नितीन सरतापे या युवकावर गेल्या 2019 सालामध्ये झालेल्या आत्याचाराची अकलूज पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दिलेली असून काही नालय बिकावू पत्रकार विनाकारण नितीन सरतापे यांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने प्रकरण नेमके काय आहे हे नजनता व आरोपीकडून पैसे घेऊन कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना उगाचच बातम्या छापून त्यांचे मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांच्यावरती झालेले अत्याचाराची रीतसर अकलूज पोलीस स्टेशनला नोंद केलेली असून तपास चालू असताना अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये येत असून ही एक लाजिरवाणी गोष्ट घडत आहे.त्यावर झालेल्या अन्यायाला दाद मागत असताना नितीन सरतापे वरती खोट्या आरोप करण्याचा जो काही डाव रचला जात आहे ही अतिशय गंभीर बाबा असून याकडे प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. नितीन सरतापे बाबत घडलेली ही घटना अतिशय गंभीर असूनआरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे,व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत अशा प्रकारची मागणी माळखांबी गावातील सर्वसामान्य लोकांची आहे, या अगोदरही नितीन सरतापे बाबत घडत असलेला हा जो काही प्रकार आहे, हा सर्व चिरीमिरी साठी होत असून, याच्या अगोदर ही हे प्रकरण दडपण्यासाठी अशाच प्रकाचे चिरीमरीवाले पत्रकारांनी भाग घेऊन सदर प्रकरण आतापर्यंत दडपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नितीन सरतापे हे आपल्या विषयावर ठाम असून आरोपीला शिक्षा व्हावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे.






Vanchit News