Vanchit News

हातकणंगले पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर चोरी.वंचित न्यूज चॅनल: दिनांक:- 11/9/2022. हातकणंगले तालुका प्रतिनिधी:- विकी कांबळे हातकणंगले पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर मजली गावाच्या हद्दीत असलेल्या गट नंबर 381 मधील भूदन गुळ कारखाना आवारातील भूदन चहा व नाश्ता सेंटरचे लॉक तोडून काउंटर मधले असलेले रोख रक्कम पंचवीस हजार सह इतर साहित्य असे एकूण 40 हजारांचे साहित्य चोरट्याने चोरून नेल्याची घटना आहे याबाबत भरत श्रीपाल पाटील राहणार मजले यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर सांगली रोडवर बोधले मंगल कार्यालयासमोर पाटील यांचे भूधन या नावाने चहा व नाश्ता सेंटर आहे आज सकाळी नाश्ता सेंटर उघडण्यासाठी पाटील यांची आई गेल्या असता त्यांना दरवाज्याची लोक तुटल्याचे तसेच आत मध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त विस्कटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यामध्ये अज्ञात चोरट्याने भरत पाटील यांनी ठेवलेली 25000 रुपयांची रोकड तसेच खाद्यपदार्थ असे एकूण 40 हजार रुपयांचे साहित्य लंपास केले आहे.


Vanchit News