Vanchit News

कोल्हापूर - आंबा घाट येथे मोठा अपघात !!!!वंचित न्यूज चॅनेल : कोल्हापूर, काल दुपारी 3.45 वाजता आंबा घाट येथे अपघात झाला. माहिती मिळाल्यावर पो. हवा. 1137 मारळकर, सोबत पो.शि./1422 नागवेकर. पो. ना./1096 कांबळे व दोन होमगार्ड मोहिते हे मोटार सायकलने पोहचले. एक ट्रक - नंबर एम. एच. 11/डी. डी. -0967 रोडचे दावे बाजूला डोंगर दरीला धडक लागून अडकला होता. त्यामध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. पैकी 1)सोनाबाई सखाराम नवघणे वय 58 ह्या मयत झाल्या. व 2) सोनबा सखाराम तुपे वय 53 यांचा उजवा हात कट झाला होता दोन्ही रा. वासोळे सातारा. दोघांना बाहेर काढले पैकी सोनबा तुपे यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवले. व मयत महिला हिला पोस्टमर्टेम साठी साखरपा येथे आणले.घटनास्थळी मा. पी. आय. जाधव साहेब. पो. हवा. /मसुरकर होते. रात्री 9.30 वाजता प्रेत नातेवाईक यांचे ताब्यात देण्यात आले.


Vanchit News