Vanchit News

बावड्यातील काकडे वस्ती येथे टाकलेल्या दरोड्यातील आरोपी केले जेरबंद.



वंचित न्यूज चॅनेल : दि.०१/१०/२०२२ उपसंपादक: सतीश जगताप(पुणे) दिनांक 15/9/2022 रोजी बावड्या जवळील काकडे वस्ती या ठिकाणी रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी टाकलेल्या दरोड्यामध्ये महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख 11 हजार सातशे रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. यामध्ये फिर्यादी सौ.अनिता अंकुश काकडे वय 35 यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचे पती व मुलगा यांना लोखंडी पाईप व लाताबुक यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन सदर दरोडा टाकला होता. हा घडलेला प्रकार फिर्यादीचा मुलगा याने फोन द्वारे पोलिसांना सांगितला.त्यानंतर गलांडवाडी नंबर दोन बाबुळगाव पाटी ,बेडसिंग रोड या ठिकाणी ,नाकाबंदी लावली होती.यानंतर गोपनीय माहितीदाराकडून सदर दोन मोटर सायकल वरती प्रत्येकी तीन तीन जन दरोडा टाकणारे बिगर नंबर प्लेटची गाडी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, उसाच्या शेतामध्ये गाडी टाकून त्यांनी पळ काढला.यानंतर पोलिसांनी या गाडी संदर्भात शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ही गाडी चोरीला गेल्याची फिर्याद इस्लामपूर पोलीस स्टेशनला असल्याचे कळले व इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या चोरी रजिस्टर ला गाडीची नोंद असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर सदर गाडी चोरणारे हे अहमदनगर जिल्ह्यातीलअसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, नगर जिल्ह्यामध्ये तपासी यंत्रणा पाठविण्यात आली. सदर गुन्ह्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब ,व इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब ,यांनी तपास यंत्रणा सक्रिय करून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी गोपनीय माहिती दाराकडून माहिती घेण्यात आली .गोपनीय माहिती दाराकडून माहिती घेण्यात आली सदर आरोपी हे कर्जत मधील राजीव गांधी नगर, या भागात असल्याचे समजले. या सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेतील अधिकारी वतपास अधिकारी यांनी सापळा लावून गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन सापळा लावला त्यामध्ये आरोपी सापडलेयामध्ये१ )संजय उर्फ निगऱ्या देवीदास भोसलेवय(२५)२)अक्षय उर्फ आलय देवीदास भोसलेवय(२१)या आरोपींनाव इतर पाच आरोपी असल्याचेही त्यांच्या कबुली जबाबात सांगीतले ,सदर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले लोखंडी पाईप त्याचबरोबर चाकू,अर्धा तोळे सोन्याचे दागिने,हस्तगत केले ,सध्या आणखी कुठे गुन्हे केल्याचे उघड होते की नाही याबाबत तपास चालू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले या सर्व गोष्टींच्या तपास कामीपोलीस अधीक्षक श्री देशमुख साहेब, अप्पर पोलीस अधीक्षकश्री मिलिंद जी मोहिते साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनची पी.आय. मुजावर साहेब स.पो.नी .नागनाथ पाटील साहेबसहाय्यक फौजदार श्री शिंदे, पोलीस हवालदार श्री गायकवाड,पोलीस हवालदार खंडागळे,पो.ना.खान,पो.कॉ.चौधर,जमादार, व राखुंडे,या सर्वांनी मिळून सदर कामगिरी केली.






Vanchit News