Vanchit News

"दया" संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव.वंचित न्यूज चॅनेल : दि.३०/१०/२०२२. भाळवणी, ता. पंढरपूर येथील डाॅक्टर आंबेडकर यूथ असोसिएशन ( DAYA/दया ) या संघटनेच्या वतीने समाजातील 5 वी ते 12 मधील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई - वडीलांसमवेत ट्राॅफी, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ इ. देवून सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील जुन्या पिढीतील मान्यवर तसेच युवा पिढीचे प्रतिनिधी विचारमंचावर उपस्थित होते. शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्या व वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणाऱ्या समाजातील युवकांनी कोरोनाच्या कठीण काळात एकत्र येत या संघटनेची बांधणी केली. कोरोनाच्या बिकट अवस्थेत समाजसेवेचे व्रत जोपासत काहींना आर्थिक मदत, अनेक निराधारांना अन्नधान्य वाटप इ. कार्यक्रम राबविण्यात आले होते. त्याच बरोबर समाजाची विस्कटलेली शैक्षणिक घडी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी गत शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पालकांचा सत्कार समारंभ करण्याची परंपरा गत दोन वर्षापासून सुरु केलेली आहे. त्यानुसार चालू वर्षात बारावी मध्ये प्राविण्य मिळवणारे 1) कु. सृष्टी गायकवाड - CET परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश 2) चि. सुमीत गायकवाड - BCS प्रवेश. दहावीला विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणारे 1) कु. श्रद्धा गायकवाड - 84 टक्के, 4)कु. पुनम मागाडे - 80 टक्के, 5)कु. अपर्णा गायकवाड - 75 टक्के, 6)कु. क्षितिजा गायकवाड - 74 टक्के, 7) पुरुषोत्तम भोसले - 72 टक्के, 8)अनुष्का भोसले - 98 टक्के शाहू काॅलेज, लातूर येथे प्रवेश, 9)शुभम गायकवाड, 10)कु.वृषाली गायकवाड तसेच इतर विद्यार्थ्यांमध्ये 1) कु. संस्कृती सातपुते - नवोदय विद्यालय पोखरापूर येथे प्रवेश, 2) कु. रचना सातपुते - राज्यस्तरीय बुद्धिवंत स्पर्धेत द्वितीय क्रमांक, 3)सुमित भोसले - गांधी विचार फोरम परिक्षेत प्रथम, 4) कु. ज्ञानेश्वरी गायकवाड - नॅशनल स्पेलथाॅन परीक्षेत गोल्ड मेडल, 5) किर्तीरत्न उबाळे - NMMS शिष्यवृत्तीस पात्र, 6)कु.यशश्री गायकवाड - नॅशनल आॅलंपियाड मॅथ्स, सिल्व्हर मेडल, त्याचप्रमाणे इतर कोर्सेसमध्ये नर्सिंगला प्रवेश मिळाल्या बद्दल 1)कु. ऋतुजा गायकवाड, 2)कु. वैष्णवी गायकवाड तसेच डी. फार्मसी प्रवेशाबद्दल 3)कु. शिल्पा मागाडे. तसेच स्वकष्टातून शिक्षण घेत असल्याबद्दल 1)सुमित मारुती गायकवाड 2) ऋत्विक धनाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे 1) समर्थ भोसले - मंथन परिक्षेत प्रथम क्रमांक, 2) अविष्कार भोसले - ज्युनिअर सायंटिस्ट (डाॅ. होमी भाभा संस्था ) तसेच नामांकित शासकीय कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी. (अॅग्री) पदवी चांगल्या गुणांनी पुर्ण केल्याबद्दल 1) कु. कांचन भोसले, 2) राजरत्न उबाळे, 3) अंकिता उबाळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दया संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्री. नंदकुमार उबाळे,(रयत शिक्षण संस्था) यांनी भूषविले. तर प्रास्ताविकात उपाध्यक्ष श्री. जालिंदर गायकवाड (गुरुजी)यांनी दया संघटना निर्मितीचा उद्देश व कार्य याचा आढावा सादर केला. याप्रसंगी कार्तिक कांबळे, ज्ञानेश्वरी गायकवाड यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले तर डाॅ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. तजिल भोसले, मिलिंद कांबळे, श्री. सुखदेव गायकवाड, श्री. सचिन भोसले सौ. लक्ष्मी गायकवाड मॅडम यांनी पालक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा. श्री. नंदकुमार उबाळे यांनी शिक्षणामुळे होणारी आपली प्रगती व व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन करताना महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘निती विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले’ या ओळींचा अर्थ विषद केला. आणि जमलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी दया संघटना आपल्या पाठीशी राहील ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नवनाथ गायकवाड (गुरुजी) आणि श्री. अमोल उबाळे (पशु वैद्यक) यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव श्री. मारुती भोसले (ग्रामसेवक) यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दया संस्थेचे मार्गदर्शक प्रा. डाॅ. श्री. अरुण भोसले (कृषी महाविद्यालय, पुणे), प्रा. डाॅ. श्री. शाहीर गायकवाड(पशु वैद्यकीय महाविद्यालय,मुंबई ), श्री. समाधान मागाडे (सहा. पोलिस निरीक्षक), श्री. पवन सातपुते(गुरुजी), श्री. समाधान गायकवाड(परिवहन म. मंडळ), उद्योजक श्री. दत्तात्रय ननवरे, श्री. लक्ष्मण काटे (वरिष्ठ व्यवस्थापक, तिरुपती वेलनेस, फार्मा कंपनी) श्री. विलास गायकवाड (सार्व. बांधकाम विभाग) श्री. वैभव गायकवाड(ग्रामसेवक), श्री. सोमनाथ भोसले(उद्योजक), श्री. अमोल गायकवाड (बँक मॅनेजर, पंजाब बँक) यांनी परिश्रम घेतले.


Vanchit News