Vanchit News

शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे सन 2013-14 मध्ये बांधण्यात आलेले बौद्ध विहार (सभागृह)अद्याप पूर्ण नाही.वंचित न्युज चॅनल :- कोल्हापूर प्रतिनिधी :- मिलिंद सामुद्रे दि.31-10-2022 नॅशनल ब्लॅक पँथर राष्ट्रीय अध्यक्षा सुवर्णताई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जुने समाज मंदिर पाडताना शासनाच्या नियमानुसार निरलेखन करणे गरजेचे होते पण जाणून बुजून बौद्ध यांच्या धार्मिक स्थळाचा अपमान व महापुरुषांची विटंबना करण्याच्या उद्देशाने निरलेखन न करता शासनाचे नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या अधिकाराचा गैर वापर करून पाडण्यात आले . हा प्रकार ग्रामपंचायत शहापूर यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे.या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या बौद्ध धार्मिक स्थळाचा अपमान करणाऱ्या 2013-14 मधील ग्रामसेवक , सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य शासकीय कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर फौजदिरी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नॅशनल ब्लॅक पँथर पन्हाळा तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे येत्या 4 दिवसांमध्ये कार्यवाही नाही केली तर सोमवार दि.07-11-2022 रोजी पन्हाळा पंचायत समिती पन्हाळा येथे आंदोलन घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


Vanchit News