Vanchit News

इंदापूर तालुक्यातील लंपी बाधित व मृत जनावरांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावू:ना.राधाकृष्णन विखे पाटील.



वंचित न्यूज चॅनेल : पुणे - दि.3/11/2022. महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे इंदापुरातील लंपी बाधित पशुपालनासाठी व मृत जनावरांसाठी वंचित न्यूज ने केली मदतीची विनंती करण्यात आली. काल पुण्यामधील कौन्सिल हॉल (विधान भवन)या ठिकाणीं राधाकृष्णन विखे पाटील यांनी महानंदा डेअरी, बैलगाडा शर्यतीवरील बंदी व पशु पालकांमध्ये लंपी आजाराबद्दल निर्माण झालेली भीती यावरती आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटीलयांना इंदापुरामध्ये असणाऱ्या सर्व लंपी आजाराच्या दैनिय अवस्थे बद्दल वंचित न्यूजचे संपादक सचिन बाबर यांनी प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये लंपी बाधित जनावरे व लंपीमुळे मृत झालेली जनावरे या सर्वांची भरपाई महाराष्ट्र शासनाकडून सर्वांना पोचवली जाईल व मदत मिळण्यासाठी जो वेळ लागतोय तो कसा कमी होईल याबद्दल आम्ही शासन स्तरावरून प्रयत्न करून तात्काळ मदत शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल. याला विलंबन लागणार नाही असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी वंचित न्यूज च्या प्रश्नाला उत्तर देताना केले.






Vanchit News