डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी वतीने बिंदू चौक कोल्हापूर येथे जातिव्यवस्थेचे निर्मूलन ग्रंथाचे वाटप.
ज्यांनी आपले तारुण्य चळवळीला कुर्बान करून महाराष्ट्रात चळवळ वाढविण्यासाठी अहोरात्र झगडण्याचा प्रयत्न केला असे सतत संघर्ष करणारे त्यागी,संघर्षशील, कृतिशील नेते गेल्या 20 वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रात महापुरुषांच्या जयंती निमित्त किंवा स्मृतिदिनानिमित्त बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी महासचिव सन्माननीय किरणजी आल्हाट साहेब यांच्या संकल्पनेतून 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिवस ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत " एक लाख(जातिव्यवस्थेचे निर्मूलन)" ग्रंथ वाटण्याचा संकल्पाला ऐतिहासिक समताभुमी ( महत्मा फुले वाडा,) या ठिकाणाहून सुरूवात. ६ डिसेबंर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन,प्रसंगी बिंदू चौक कोल्हापूर या ठीकाणी कोल्हापूर जिल्हा प्रभारी संदीप शिंदे, चंद्रशेखर कापशीकर , श्रीकांत कांबळे, सुरेश आठवले, व कार्यकर्ते उपस्थीतीत होते.