Vanchit News

बावडा दुरक्षत्र परिसरातील गावठी अवैद्य दारू धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई.



वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दिनांक:०९/१२/२०२२ इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने अवैद्य बेकायदेशीर हातभट्टी दारू बाबत गोपनीय माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ असे मिळून प्रोहिबिशन रेड पथक रवाना केले. सदर पथकाने आज दि.०९/१२/२०२२ रोजी पहाटे सहा वाजता बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आठ जणावर रेड करून मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे बॅरल ०५ नग , दोनशे लिटर १२ नग, शंभर लिटर ०१ नग व इतर साहित्य असा एकूण २२८००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आठ जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र येथे सुरू आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के बी शिंदे, युवराज कदम, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस हवलदार मनोज गायकवाड, पोलीस नाईक सलमान खान, अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, महिला पोलीस नाईक मुजावर, पोलीस शिपाई विकास राखुंडे, दिनेश चोरमले यांनी मिळून केली.






Vanchit News