Vanchit News

मा.केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी बुद्रुक येथे रक्त दान शिबिरासाठी लोकांचा उदंड प्रतिसाद.



वंचित न्यूज चैनल निरा नरसिंहपुर दिनांक :11, उपसंपादक : सतीश जगताप. देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कैलासवासी लोक नेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले. पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणात माजी आदर्श सरपंच श्रीकांत शिवाजी बोडके व विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या सहकार्याने सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरा मध्ये तपासणी व पेशंटला मार्गदर्शन करण्यासाठी 1). समीर दोशी, हृदय रोग तज्ञ संनमती हॉस्पिटल अकलूज 2)डॉ. स्वप्निल दोशी श्री रोग तज्ञ जीवन रत्न हॉस्पिटल अकलूज 3). सोनाली स्वप्निल दोशी 4)डॉ.वैशाली समीर दोशी त्वचा रोग तज्ञ 5)डॉ. सुधीर खंडागळे, दंत रोग तज्ञ 6) डॉ. बाहुबली दोशी,,, या सर्व डॉक्टर तज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांची सर्व शारीरिक व वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला,,पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या 38 व्या वाढदिवसा निमित्त गोर गरीब 38 माता-भगिनींना रघ व ब्लॅंकेट प्रत्येकी एक प्रमाणे वाटपही करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी अकलूज तालुका माळशिरस येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक सेंटर अकलूज यांच्या सौजन्याने व ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी . बाहुबली दोशी सह सर्व तज्ञ डॉक्टर स्टॉप यांनी रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.प्रत्येक रक्त दात्यास ब्लड बँके तर्फे प्रमाणपत्र व माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या वतीने,,टी शर्ट, थंडीच्या संरक्षणासाठी रजई, व राज्यशाही कुपन या भेटवस्तू प्रत्येकी एक देण्यात आल्या तर त्या सोबत केळी, बिस्किट, चहा, नाष्टा , सर्व रुग्णांना देण्यात आला. 35 ग्रामस्थांनी रक्तदानाचा हक्क बजावला तर,110 रुग्णांच्या हृदयाची ईशीजे तपासनी,,40 त्वचा रोगाच्या तपासनी,, 45 दातांच्या आजाराची रुग्णांची तपासणी,,30 स्त्री रोग निदान तपासणी,,50 बी .पी आणि शुगर तपासणी, अशा एकूण एकूण 310 नागरिकांनी शिबिरामध्ये भाग घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग व गावातील आजी, माजी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,विद्यालयातील कर्मचारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहुन शिबिराचा लाभ घेतला ,,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक भारत कोरटकर यांनी मांडले.






Vanchit News