उपविभागीय अभियंता उजनी प्रकल्प पुनर्वसन उपविभाग पंढरपूर तालुका पंढरपूर यांचा भोंगळ कारभार.
वंचित न्यूज चैनल :- माढा तालुका प्रतिनिधी :- अमोल जाधव. दिनांक:- 20-12-2022. मौजे शेवरे तालुका माढा जिल्हा सोलापूर या गावांमध्ये उजनी प्रकल्पग्रस्त लोकांचे पुनर्वसन शेवरे गावांमधील कुरण वस्ती येथे झालेले आहे. प्रकल्पग्रस्त लोकांसाठी कुरण वस्तीमध्ये जि. प. प्राथमीक शाळा आहे. त्या शाळेला पुनर्वसन विभागामार्फत संरक्षण भिंतीचे काम सुमारे 32 लाखाचे मंजूर झालेले आहे, परंतु ते काम पुनर्वसन झालेल्या शाळेला न होता खताळ वस्तीवरील जि. प. प्राथमीक शाळा गायरान जमिनीवर असलेल्या शाळेला केलेले आहे. त्या शाळेचा आणि पुनर्वसन विभागाचा विभागाचा काहीही संबंध नाही. परंतु खाताळ वस्तीवरील काही राजकीय पुढार्यांच्या हेतू परस्पर ते काम प्रकल्पग्रस्त झालेल्या शाळेला न करता दुसऱ्याच वस्तीवरील शाळेला केलेले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी तक्रार माननीय १) पुनर्वसन जिल्हाधिकारी सो सोलापूर २) माननीय कार्यकारी अभियंता उजनी प्रकल्प विभाग क्रमांक 8 आणि ३) उपविभागीय अभियंता उजनी प्रकल्प पुनर्वसन उपविभाग पंढरपूर यांना शेवरे गावातील ग्रामस्थ प्रदीप उत्तरेश्वर मस्के यांनी लेखी तक्रार दिनांक 4-10-2022 रोजी दिलेली आहे. परंतु त्या तक्रारीवर अजून पर्यंत कोणतेही कारवाई झालेली नाही. त्या अर्जावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न केल्यास जन आंदोलन उभारणार आहे अशी माहिती शेवरे गावातील ग्रामस्थांनी दिलेली आहे.