Vanchit News

लासुर्णे येथे दुमदुमला माजी विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक भव्य स्नेह मेळावा.



वंचित न्यूज चैनल: उपसंपादक :सतीश जगताप. दिनांक:25/12/2022. महाराष्ट्रातील सगळ्यात आगळावेगळा व न भुतो न भविष्यती असा स्नेह मेळावा लासुर्णे येथे संपन्न. श्री.निळकंठेश्वर विद्यालय लासुर्णे येथील सन 2001-2002 च्या दहावीच्या बॅचचा मेळावा प्रचंड भव्य नियोजनात पार पडला. प्रचंड उत्साहात फटाक्यांची आतषबाजी फुलांच्या वर्षांवात गेट टुगेदर संपन्न. २१ वर्षांतुन सगळे आले एकत्र. माजी शिक्षकांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा. 25 डिसेंबर 2022 वेळ सकाळची आठची, रविवारचा दिवस अन् लासूर्णे येथे मॅजिक सिजर या दुकानासमोर बघ्यांची गर्दी वाढू लागली. बारामती इंदापूर हायवे वरील वाहने थांबू लागली. ३६ च्या वयोगटातील युवक रंगीत फेटे घालून उभे होते, त्यांच्यात हास्य फवारे चालू होते, एकमेकांना कडकडून मिठ्या मारल्या जात होत्या,आलिंगन दिले जात होते.फोटोशूट चालू होते. लोकांना समजत नव्हते हा काय प्रकार आहे त्यातच अजुन काही युवक सायकलीवर ,काळी पॅन्ट, पांढरा शर्ट घालून , शाळेची बॅग खांद्यावर अडकवून येत होती.संख्या वाढत चालली आणि अचानक तेथे फटाक्यांची आतिषबाजी झाली व फुलांच्या वर्षांवात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जय जय काराच्या घोषणा देत व रयत शिक्षण शिक्षण संस्थेच्या विजयाच्या घोषणा देत हे युवक एका रांगेत श्री.नीलकंठेश्वर विद्यालय लासुर्णे च्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. बघ्यांची संख्या वाढत होती.प्रचंड प्रचंड उत्साह युवकांमध्ये संचारला होता. एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आले होते की हे सन 2001-2002 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे आज स्नेहसंमेलन आहे व ज्याची गेले महिनाभर तयारी चालू होती व त्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होती. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी लांबून विद्यार्थी आले होते. आदल्या दिवशीच २०० ते३०० किलोमीटर लांबून कोल्हापूर ,मुंबई,बार्शी ,पुणे व इतर ठिकाणांहून सत्तरी गाठलेले तत्कालीन शिक्षक मुक्कामी आले होते.त्यांचे नियोजन राजमुद्रा हॉटेल लासुर्णे येथे आताचे उद्योजक व तत्कालीन विद्यार्थी महादेव जमदाडे यांनी केले होते. त्या शिक्षकांनीही आपली जुनी शाळा,वर्ग आदल्या दिवशी मन भरून बघून घेतले किंबहुना त्यांना तो मोह आवरता आला नाही. या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार झालेल्या व प्रचंड उत्साह असलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत पुष्पवर्षांवात आगमन केल्यानंतर शाळेच्या गेट पासून अति भव्य देखण्या मंडपापर्यंत दुतर्फां उभे राहून आलेल्या तत्कालीन सर्व शिक्षकांचे फुलांच्या वर्षांवात स्वागत केले. शिक्षकांवर प्रेम व्यक्त केले. आम्ही तुमच्यामुळेच घडलो हे भाव मनी जपत आपोआप कित्येक जणांचे हात त्या गुरुजन वर्गाच्या पायापर्यंत जात होते. नतमस्तक होत होते. यावेळी काढलेली रांगोळी सुध्दा सर्वांची स्वागत करीत होती.त्यामुळेच त्या रांगोळी सोबत फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही. पुन्हा तीच शिस्त, तिच रांग, तेच सावधान- विश्राम, तेच राष्ट्रगीत, तीच प्रार्थना जणू काही विद्यार्थी दशेतील तोच माहोल अनुभवास येत होता.कुटुंबाची ओढ नव्हती, शेतीवाडी, कामधंदे सगळे विसरून गेले होते.फक्त मित्रांना भेटण्याची ओढ होती.शिक्षकांना भेटण्याची ओढ होती.कोण श्रीमंत नव्हता, कोण गरीब नव्हता. उच निच कोणी नव्हता. सगळे डोळे भरून शाळा बघत होते.आपला जिवलग मित्र शोधत होते. पुन्हा एका एका रांगेत जाऊन मंडपात जाऊन सर्व विसावले.भव्य अशा मंडपात एका बाजूला जेवणाचा कक्ष उभारला होता. तेथे चहा आणि नाश्ता सर्वांनी घेतला.मंग सुरू झाला प्रमुख कार्यक्रम. प्रथम ज्या कर्मवीराने रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात रोवला त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तसेच ज्या माऊलीने कर्मवीर अण्णांना लाख मोलाची साथ दिली त्या लक्ष्मीबाईंच्या व पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. हयातीत नसलेल्या गुरूजन वर्गांला व मित्रांना अत्यंत भावपुर्ण वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे चालू केला.तत्कालीन सर्व शिक्षकांचा व त्यावेळी असलेल्या शिक्षकेत्तर स्टाफचा तत्कालीन विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सत्कार केला. प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभत होते. आता पुढे सुरू झाला हजेरीचा तास.तेव्हाच्या कोपरखळ्या, एकमेकांना डवचने, चिडवणे , बापाच्या नावाने हाक मारणं सुरू झाले. श्री आवटी ए.डि. सर व श्री कदम आर.आर. सर यांनी सर्वांची हजेरी घेतली. हास्य फवारे उडत होते, वातावरण खूपच हलकेफुलके झाले होते. प्रत्येक जण आपला खांदा दुसऱ्याला वापरायला देत होता. प्रत्येकाचे हात कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर होते. यावेळी या शाळेत कार्यरत असलेले विद्यमान खंडागळे सर व जाधव सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.पुढे प्रमोद गायकवाड या विद्यार्थ्यांने प्रास्ताविक केले. मंग एक एक विद्यार्थी की जो कधी शाळेत असताना बोलला नाही तो आज बोलका झाला होता. अजित लोंढे, सुधीर भोसले ,डॉक्टर धनंजय खताळ, शितल ठोंबरे ,प्रवीण लोंढे ,विष्णू माने, विशाल मुळीक,महादेव जमदाडे ,सागर मिसाळ ,सुरज वनसाळे व खूप काही विद्यार्थ्यांनी हृदयापासून आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकांप्रती, शाळेप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. यानंतर आवटी ए.डि.सर, कदम आर.आर.सर, वणवे सर, साबळे डी. एस सर व श्री निलकंठेश्वर विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य साबळे सी.डी.सर यांनी आपल्या आठवणी सांगून इथून पुढे ही कसे मार्गक्रमण करावे याचे ज्ञान दिले. सर्वजण भाराहून गेले होते. यावेळी शाळेतील विद्यमान मुलांना खो-खोचे सात हजार रुपयांचे कपड्याचे किट दिले व 26 जानेवारी रोजी ५० हजार रुपयांचे आता शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना कपड्याचे व वह्यांचे, दप्तराच्या किटची घोषणा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर मिसाळ यांनी मानले व फोटो सेशन झाल्यानंतर अतिशय उत्कृष्ट अशा मिष्ठान्न भोजनाचा सगळ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. पुन्हा सुरू झाला वर्गांतील तास.सर्व मुले भावनाविवश होऊन आपला वर्ग न्याहाळत होते. आपला बाक शोधत होते. आपला बाकावरील जोडीदार शोधत होते.फळ्यावरील जुन्या शिक्षकांचे हस्ताक्षर शोधत होते. तेवढ्यात पुन्हा सुरू झाले कदम आर. आर. सरांचे गाणे. गुरव सर , ठोकळे सर , कांबळे बी. एल सर यांचे लेक्चर झाले. जे वर्गात लेट आले त्यांना पुन्हा वीस वर्षांनी अंगठा धरण्यास भाग पाडले.आनंदाने त्यांनीही अंगठा धरून आठवणी ताज्या केल्या. एक - दोन मुलांचे असलेले हे उत्साही बाप, पालकांच्या भूमिकेत ,प्रतिष्ठित नागरिकांच्या भूमिकेत असलेले हे युवक कोण पोलीस होते, कोण शिक्षक होते,कोण डॉक्टर होते,कोण उद्योगपती होते, कोण राजकारणी होते, कोण नोकरदार तर कोण बागायतदार शेतकरी होते, काही जण लहान मोठा व्यवसाय करीत गुजराण करणारे होते पण हे युवक तेवढ्याच नम्रतेने जुन्या शिक्षकांसमोर तेवढेच नतमस्तक होत होते. शिक्षकांनाही हे सर्व बघून भारावून गेले. ‌ पुन्हा शेवटच्या सत्रात मनोरंजन म्हणून सर्व मुलांनी सुंदर असा डान्स केला. तब्बल सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल ९ तास कार्यक्रम चालला. तोही कुठलाही गालबोट न लागता व तेवढ्याच जल्लोषात, उत्साहात. शेवटी वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी तत्कालीन विद्यार्थी प्रिय शिक्षक कदम आर.आर.सर, साबळे डी.एस सर, गुरव सर, लोणकर सर, कांबळे जे,टी. सर,कांबळे एन.एन.सर, वायदंडे सर, कांबळे व्ही. एच सर, शिंदे सर, शिंदे जे.एन सर, वनवे सर, कांबळे बी.एल. सर, ठोकळे सर, भोंग सर हे शिक्षक वृंद तर तावरे मामा,राऊत मामा, सुतार मामा,घोळवे मामा, ढवान मामा, चव्हाण मामा हे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य म्हणून साबळे सी.डी सर यांनी प्रचंड सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कोअर कमिटी टीम तसेच संदीप लोंढे, अमोल सूर्यवंशी,तुकाराम देवकाते,दत्ता लोंढे,शितल रासकर,सचिन जामदार, सिद्धेश्वर राऊत, रणजीत लाखे ,उस्मान सय्यद, चैतन्य सासवडे,अमित बनकर,दादा चव्हाण,सचिन लोंढे, सुनील वाघमोडे या व सर्व मित्रपरिवार परिश्रम घेतले. विशेषता स्कोअर कमिटीचे खजिनदार शितल ठोंबरे, राघु गायकवाड, विष्णू माने, महादेव जमदाडे यांनी पुर्णवेळ परिश्रम घेतले. संपूर्ण एक दिवस मोह,माया सर्व विसरून फक्त मित्रांच्या सानिध्यात रममाण होण्यास भाग पाडलेल्या या कार्यक्रमाची आठवणी हृदयात कोरून जड अंतःकरणाने पुन्हा २५ डिसेंबर २०२३ ला एकत्र येण्याचे एकमेकांना आश्वासन देऊन एकमेकांना निरोप दिला.






Vanchit News