Vanchit News

*अक्षय भालेराव याच्या खुन्यांना फाशीची शिक्षा द्या - सुरज वनसाळे* *नांदेड जिल्ह्यातील भिमसैनिक अक्षय भालेराव याच्या खुनाच्या निषेधार्थ वालचंदनगर ते जंक्शन निषेध मोर्चा व निषेध सभा संपन्न.



वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप दि.०८. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनाला चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या वालचंदनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सव्वा दहा ते साडे दहाच्या च्या दरम्यान सुरवात झाली. भयानक उन्हात व प्रचंड आक्रमकपणे आपल्या समाजबांधवाला न्याय मिळावा यासाठी युवक रस्त्यावरून घोषणा देत जंक्शन येथे तब्बल दोन तासांनी पोहचला. व तिथे निषेध व्यक्त करून प्रशासनाला या खुन खटल्याच्या संदर्भात निवेदन दिले. हे निवेदन जंक्शन पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी घेतले.हा खुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना फाशीची शिक्षा करा हि प्रमुख मागणी आंदोलकांनी मागणी केली. या मोर्चाचे नेतृत्व मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी केले.तर या मोर्चात ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, विनायक लोंढे, सर्जेराव लोंढे, किशोर काळे, विजय चितारे, निलेश खरात, आकाश पवार, किरण भागवत, विशाल सोनवणे, अजित ठोकळे, आतिश मिसाळ, विशाल भोसले, सुमित घोडके, अनिता कांबळे, दिपक लोंढे, अजित लोंढे , पंकज बनसोडे, ॲड.पोळ व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे अनिल केंगार, आप्पासो कदम, नागेश भोसले, क्षितीज वनसाळे, सौरभ धनवडे, आशिष भागवत, अजय फले या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






Vanchit News