Vanchit News

भीमशक्ती सामाजिक संघटनेमार्फत इंदापूर तहसीलदार यांना नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथिल खून खटल्या संदर्भात निवेदननांदेड जिल्ह्यातील बोंडार येथील अक्षय भालेराव खून खटल्यातील कुटुंबाला 50 लाखाची मदत व ॲट्रॉसिटी गुन्ह्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी इंदापूर तालुका भीमशक्ती सामाजिक संघटनेचेतालुका अध्यक्ष युवराज मामा पोळ यांनी लेखी निवेदन मा. तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर तहसील यांना देऊनया घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. या खून खटल्यातील आरोपींची एस.आय.टी.कडून सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, तसेच ॲट्रॉसिटी संदर्भातले इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारीव इंदापूर तालुकाध्यक्ष युवराज मामा पोळ, उपाध्यक्ष विजय नाना साळुंखे,सिंहा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सम्राट भैया पोळ,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Vanchit News