Vanchit News

आळते ग्रामपंचायतचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय ( 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतेही कारण न देता तोंडी आदेशाने कामावरून काढले



वंचित न्यूज चैनल सह संपादक:- एस एम कांबळे तारीख :- 22/6/23 कोल्हापूर/ :- आळते ( तालुका हातकणंगले ) ग्रामपंचायतीकडे 10 वर्षे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर ग्रामपंचायतीने अन्याय केला असून कोणतीही कारण न देता तोंडी आदेश देऊन त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे याबाबत त्यांनी सातत्याने अर्ज विनंती करून ही त्याची दाद घेण्यात आलेली नाही याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांच्याकडे अर्जाद्वारे दाद मागितली असून कामावर घेण्याची विनंती केली आहे (आळते तालुका हातकणंगले )येथील ग्रामपंचायतीकडे 2012 पासून बळवंत देवाप्पा कांबळे हे सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत परंतु त्यांना नोकरीत कायम करण्याऐवजी कोणतेही कारण न देता किंवा लेखी आदेश न देता तोंडी आदेशाने 23 ऑगस्ट 2019 पासून कामावरून कमी केले असल्याचे सांगितले याबाबत त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांच्याकडे तक्रार दाखल केली असता त्यांना 18 मे 2020 पासून पूर्ववत कामावर घेतले परंतु 26 जानेवारी 2022 पासून तो नियमित कामावर हजर असताना त्यांना कोणतेही प्रकारचे काम देण्यात आले नाही तुम्ही कामावर येऊ नका कामावर आला तरी तुमचा पगार दिला जाणार नाही असे क्लार्क करवी त्यांना सांगण्यात आले ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये एका गरीब कर्मचाऱ्यांचा बळी गेला असून कोणतेही कारण न देता किंवा लेखी आदेश न देता ग्रामपंचायतीने 10 वर्षे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यावर अन्याय केला आहे याबाबत त्यांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला असता त्याला कोणी दाद दिलेली नाही त्याच्या पाठीमागे कोणतीही राजकीय ताकद नसल्याने त्याच्यावर अन्याय केला जात आहे ग्रामपंचायत ही कृती बेकायदेशीर व मनमानी कारभार असल्याने सामाजिक संघटनांनी आवाज उठवून ग्रामपंचायतीला याबाबत जाब विचारणे आवश्यक आहे अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.






Vanchit News