Vanchit News

*27जुलै पासून जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने महावृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार - श्री अंकुश जाधव सर



वंचित न्यूज चैनल माढा तालुका प्रतिनिधी: अमोल जाधव दि.२०/०७/२०२३ लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि समाजभूषण कै.रामभाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै. भारतनाना पाटोळे मेजर, कै. सूनीलभाऊ कामाठी यांच्या स्मरणार्थ 27 जुलै 2023 पासुन सलग पाच दिवस माढा तालुक्यातील 50 गावामध्ये जवळपास 2000 झाडे लावण्याचे महावृक्षारोपण अभियान राबविले जाणार असल्याचे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अंकुश जाधव सर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. पुढे ते बोलताना म्हणाले की मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.निसर्गापासून माणसाच्या गरजा पूर्ण होतात. निसर्गाची देणगी म्हणजे झाड आणि झाडे आहेत म्हणुन तर आपण या पृथ्वीतलावर सुखरूप आहोत. झाडापासून आपल्याला प्राणवायू मिळतो.माणसाच्या जीवनात झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे . मात्र भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे परिसरातील झाडे कमी झाली आहेत.त्यामुळे कडक उन्हाळा,प्रदूषण, कमी पाऊस अशा समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा समस्या तून अपल्याला आपली आणि पर्यावरणाची सुटका करून घ्यायची असेल तर वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. वृक्षारोपण करण्याचे खूप फायदे आहेत. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झाडाचा फायदा होतो. झाडापासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक झाडामध्ये औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषधे तयार केली जातात. पक्षी आणि प्राणी यांना झाडे हे संजीवनी प्रमाणे असतात. परंतु वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. अशा परिस्थतीमध्ये आपल्याला योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्यामुळे आम्ही गेल्या वर्षी पासुन वृक्षारोपण उपक्रम घेत आहे. गेल्या वर्षी मोडनिंब येथे श्री खंडोबा मंदिर परिसरात 55 झाडे लावली होती. या वर्षी त्यात वाढ करत आम्ही जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि समाजभूषण स्व. रामभाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै. भारत नाना पाटोळे मेजर आणि कै. सूनिलभाऊ कामाठी यांच्या स्मरणार्थ माढा तालुक्यात 50 गावामध्ये जवळपास दोन हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 27 जुलै पासून सलग पाच दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. माढा तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व कार्यकर्ते वृक्षारोपण अभियानासाठी सज्ज झाले आहेत तरी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकानी यामध्ये सहभागी व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावे . यावेळी शेतकरी आघाडीचे अध्यक्ष श्री बापूसाहेब जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ सतीश माने,तालुका अध्यक्ष श्री किरण जाधव, वधू वर अध्यक्ष राजाभाऊ जाधव,युवक सचिव महाराष्ट्र अतुल पाटोळे, वाहन चालक मालक आघाडीचे सचिन माने, राज्य सदस्य भारत आप्पा जाधव,राज्य सदस्य बंडू माने , राज्य सदस्य महादेव जाधव ,संघटक रामभाऊ चव्हाण,युवक अध्यक्ष राहूल मदने, जिल्हा कार्याध्यक्ष युवक नितीन आबा जाधव, युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्या चव्हाण,युवक उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, प्रसिध्दी प्रमुख भाऊ मसुगडे, युवक संघटक शरद गुजले,उपाध्यक्ष बापू बोडरे, स्टार प्रचारक दत्ताभाऊ चव्हाण,सचिन चव्हाण, भैय्या चव्हाण,करमाळा विभाग अध्यक्ष बापू माकर, शिदू मदने, अमोल मदने, शंकर बोडरे, संजुभाऊ माने, पिंटू शिरतोडे, शंकर जाधव, तानाजी मदने, दादा जाधव, लक्ष्मण शिरतोडे, पोपटराव चव्हाण, बाबा जाधव, बंडू शिरतोडे, देवा माने, चांगदेव माने, महावीर मदने,पांडूरंग जाधव वाघोबा माने, अमोल माने इत्यादी उपस्थित होते






Vanchit News