Vanchit News

वंचित न्यूज चैनल बेडगच्या आंबेडकरी समाजाने बायका-पोरांसह गाव सोडले ( मुंबईकडे भर पावसात लॉन्ग मार्च स्वागत कमान पाडल्याने न्याय मागणार



सहसंपादक:- एस एम कांबळे दिनांक :- 20/7/2023 मिरज:- बेडग ( ता.मिरज ) येथील आंबेडकरी समाजातील सुमारे150 कुटुंबाने मंगळवारी गाव सोडून मुंबईकडे कुच केली भर पावसात निळ्या ध्वजासह महिला देखील मोठ्या संख्येने लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पडणाऱ्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे करणार आहेत बेडगमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायततिने एका महिन्यापूर्वी जमीनदोस्त केली त्यामुळे ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा संघर्ष सुरू आहे ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती मात्र ती बेकायदा असल्याचे ठरवून 16 जून रोजी पाडून टाकली जिल्हाभरातील आंबेडकरी समाजाने त्याचा तीव्र निषेध केला कमान पडल्यापासून गावातील वातावरण धगधगते असून वार - प्रतिवार सुरू आहेत मिरजेत या संदर्भात समाजाची बैठक झाली त्यामध्ये मंत्रालयावर लॉन्ग मार्च लॉंग मार्च काढण्याचे ठरले संतप्त समाजाने थेट गाव सोडण्याचा निर्णय केला त्यानुसार मंगळवारी सकाळीच महिला पुरुष निघाले आहेत काही वाहनांमध्ये महिला मुले व आंदोलकांच्या साहित्याचे व्यवस्था करण्यात आली आहे ठोस निर्णय झाल्याशिवाय गावाकडे परतायचे नाही या भूमिकेतून आंदोलक मुंबईसाठी रवाना झाले आहेत -: अंथरून पांघरून साहित्य सोबत घेऊन पायपीट :- कमाल पडणारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर कारवाईसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते मात्र प्रशासन त्यांना पाठीशी राहत आहे पाठीशी घालत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे प्रशासनाने बैठक घेऊन तोडगा प्रयत्न केला पण तो तोडगा निघाला नाही बेडगमधून दुपारी बाराच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात आंदोलकांनी मुले बाळे , अंथरून पांघरून कपडे व संसार उपयोगी साहित्यसह गाव सोडले आहे भर पावसात दुपारी तीन वाजता आंदोलक मिरजेत पोहोचले निळाध्वज फडकवत महिला मुले अग्रभागी होती -: पालकमंत्री खासदारांचा प्रशासनावर दबाव :- ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप आंदोलकांचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला बेमुदत उपोषणे सुरू केल्यानंतर जनसुराज्य वगळता कोणत्याच पक्षाने आंदोलकांना भेटण्याची तसदी घेतली नसल्याचे ते म्हणाले -: पहिला मुक्काम मिरजेत :- मंगळवारी दुपारी मिरजेत पोहोचल्यानंतर आंदोलकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर ठिय्या मारला जमावामुळे पोलिसांना वाहतूक वळवावी लागली पहिला मुक्काम मिरजेतच करण्याचे ठरले त्यानुसार निवासाची भोजनाचे तजवीज करण्यात आली






Vanchit News