Vanchit News

जैन समाजाचे मूक मोर्चाद्वारे तहसीलदार व पोलीस ठाण्यास निवेदन



सहसंपादक:- एस एम कांबळे दिनांक :- 21/7/2023 हातकणंगले / कोल्हापूर कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामध्ये जैन मुनि काम कुमार नंदी महाराज यांची काही समाज कंटकांनी क्रुर हत्या केली त्या निषेर्धार्थ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून हातकंणगले पंचक्रोषीतील जैन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तहसिलदार कल्पना ढवळे आणि हातकंणगले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिक्षक रविद्र भोसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक निशाणदार यांना निवेदन देण्यात आलें.समाजाच्या भावना वरीष्ठांपर्यत पोहचवण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की जैन समाजाचे रक्षण अशा त्यागी महाराजां कडून होत आहे.सर्व त्यागी व जैन समाजाच्या वतीने जगा व जगू द्या असा संदेश सर्वत्र दिला जातो.अशा त्यागीची हत्या होणे अंत्यत चुकीचे आहे.यातील आरोपींना कठोर शासन व्हावे आणि सर्वत्र अशा त्यागीचे व तीर्थ क्षेत्राचे शासनाने रक्षण करावे असे निवेदनात म्हटले आहे. मूक मोर्चा असल्याने कोणतीही घोषणाबाजी न करता जैनमंदिर पासून निघालेला मोर्चा बाजारपेठेतुन पोलीस स्टेशन जवळ आला. मोर्चाच्या सुरवातीस धर्म ध्वज नंतर निषेधचा फलक पाठोपाठ असंख्य जैन बंधू भगिनी होते.मोर्चामध्ये हातकणंगले आळते,मजले,नेज येथील मंदीर कमिटीचे सर्व सदस्य,वीर सेवा दल व वीर महिला मंडळाचे सर्व स्वयंसेवक व श्रावक,श्राविका उपस्थित होते






Vanchit News