*मौजे टणू गावातील दलित वस्तीचा पाणी प्रश्न नूतन सरपंच प्रतिनिधी समीर पाटील यांनी सोडविला.

वंचित न्यूज चैनल उपसंपादक: सतीश जगताप टनु गाव हे भीमा नदीच्या काठावरती असलेले २५५० लोकसंख्येचे लोकसंख्येचे गाव आहे ट नु गावामध्ये दलित लोकसंख्येचे प्रमाण खूप असून या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न नूतन सरपंच प्रतिनिधी समीर पाटील यांनी पदभार स्वीकारताच गावठाण दलित वस्ती चा पाणी प्रश्न सोडविला. गावामध्ये हर घर जल योजनेची योजना सध्या पूर्णत्वास गेली नसून गावठाण दलित वस्ती चा पाणी प्रश्न हा गंभीर होता, गावठाण दलित वस्तीतील हातपंप हा खराब असल्यामुळे तेथील पाणीही पिण्यायोग्य नव्हते म्हणून तातडीचा पाणी प्रश्न मिटवला त्याबद्दल सर्व समाज बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले. गावठाण दलित वस्ती मध्ये बोरवेल ची सुविधा उपलब्ध केली त्यावेळी पाण्याचे पूजन करताना गावातील बाळासाहेब जगताप, बापूराव जगताप गौतम मोहिते ,अरुण जगताप, लहू जाधव ,पांडुरंग मोहिते ,परमेश्वर जगताप ,रणजीत मोहिते, जगन्नाथ जगताप, विलास मोहिते, हे सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी वंचित न्यूजशी बोलताना समीर पाटील यांनी सांगितले, की भविष्यात आपण दलित वस्तीला विकास साच्या दृष्टीने प्राधान्य देणार आहे.