Vanchit News

निवडणुका घेण्यास केंद्र व राज्य सरकार घाबरते... वसंतराव मोरे. *इंदापूरात मनसेच्या नवीन शाखेचे वसंत मोरे यांचे हस्ते उदघाटन



—————————————————— वंचित न्यूज चैनल उपसंपादक. सतीश जगताप दिनांक 05/09/2023 ——————— इंदापूर : केंद्रसरकारने स्वतला सुरक्षीत करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आनेक दिवसापासुन थांबविल्या आहेत.महाराष्ट्रातल्या सर्वच नगरपरिषदा ह्या प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत.राज्य सरकार व केंद्र सरकार हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत.त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थाच काय परंतु थोड्या दिवसांनी विविध कार्यकारी सोसायट्यांच्याही निवडणुकांना स्थगीती देतील, आणि त्यांना जो हेतु साध्य करावयाचा आहे तो ते साध्य करून घेतील.परंतु त्यांनी कधीही निवडणुका घ्याव्यात त्यासाठी आम्ही तयार असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटनीस तथा पुणे म.न.पा.माजी नगरसेवक वसंतराव मोरे यांनी इंदापूर येथे मनसे नूतन शाखा उदघाटन प्रसंगी बोलताना केले. महाराष्ट्रात भाजपा,राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळुन दोनशे आमदारांचे भक्कम पाठबळ असलेले बहुमतातील सरकार सत्तेत आहे.शिवाय मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत.तरीही मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय मिळत नाही ही गोष्ट खेदजनक आहे.मुळात या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छाच नाही.जालना जिल्ह्यात सनदशिर मार्गाने आरक्षणाची मागणी करणार्‍या मराठा समाज बांधवावर पोलीस बळाचा वापर करून बेसुमार लाठीचार्ज केला गेला.यामध्ये शेकडो आंदोलक जखमी जखमी झाले, ही घटना अतिशय निषेधार्ह असुन दोनशे आमदारांचे भक्कम पाठबळ असलेल्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडवलय कोणी ? अशी खोचक टीका वसंतराव मोरे यांनी सरकारवर केली. इंदापूर शहरातील गणेशनगर(टेंभुर्णी नाका) येथे शनिवार दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नुतन शाखेचे अदघाटन वसंतराव मोरे यांचे हस्ते करण्यात आले,त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वसतराव मोरे बोलत होते.ते म्हणाले की, इंदापूरचे आणि माझे नाते जुनेच आहे. इंदापूर तालुक्यातील खुप जुणे कार्यकर्ते ते पदाधिकारी म्हणुन काम करनारे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे,जिल्हा सचिव रामभाऊ काळे हे गेल्या पंधरा सोळा वर्षापासुन संपर्कात आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी खांद्यावर घेवुन पुढे वाटचाल सुरू असुन बारामती लोकसभा मतदार संघात पक्ष बांधनीचे काम जोमाने सुरू असल्याचे मोरे म्हणाले. याप्रंगी मनसे पुणे जिल्हाध्यक्ष पोपट सुर्यवंशी,मनसे जिल्हा सचिव रामभाऊ काळे, मनसे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र हजारे,अॅड.नितीन राजगरू,मनसे इंदापूर ता.अध्यक्ष संतोष भिसे,मनसे बारामती ता.अध्यक्ष अॅड.निलेश वाबळे, मनसे इ.ता.उपाध्यक्ष प्रदिप रकटे,सामाजिक कार्यकर्ते महेश वाघमारे,मनसे इ.ता.सचिव,मल्हारी लोखंडे, मनसे इ.ता. उपाध्यक्ष रोहितराजे भोसले, मनसे.इ.ता.संघटक सरेश व्यवहारे,मनसे.विद्यार्थीसेना आघाडीचे राजू भोंग,सागर खटके,बाळासाहेब हजारे,प्रसाद हजारे,राहुल हजारे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.तर शाखा उदघाटनासाठी राहुल हजारे, प्रसाद हजारे, रामभाऊ कांबळे, दत्ता कोळी,सिद्धू खराडे सिद्धू,बाळू हजारे, विशाल पवार, सचिन पवार, महेंद्र वाघमारे, अशोक पाटील, बिभीषण देवकर,दिपक हजारे, सोमनाथ हजारे, किरण गोसावी, सोहेल बागवान, इम्रान बागवान, नासिर शेख, अविनाश कांबळे ,आण्णा बनसोडे, किरण वाघमारे, मंगेश वाघमारे इत्यादींनी परिश्रम घेतले.






Vanchit News