Vanchit News

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड



वंचीत न्युज चॅनल उपसंपादक सतिश जगताप दि.०७/१०/२०२३ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडी अध्यक्षपदी संतोष अंबादास दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी बलभीम पवार, यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतेच अकलूज येथील श्रीराम मंदिरामध्ये (दि २७ )सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी संतोष अंबादास दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी बलभीम पवार यांची निवड एकमताने करण्यात आली.या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आबासाहेब उगलमोगले, सचिव पदी सत्यजीत रणवरे,खजिनदार पदी गणेश गुप्ते यांचीही निवड एकमताने बिनविरोध करण्यात आली.यावेळी जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीचे सक्रिय सदस्य संभाजी रणवरे,संदीप सुतार, सचिन खुरंगे, सुरज पिसे आदी उपस्थित होते.यावेळी नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते - पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार बांधवांनी गोरगरिबांचे सामाजिक प्रश्न, आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सोडवावेत पत्रकार बांधवांना काही अडचण आल्यास महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना खंबीरपणे पाठीशी उभी राहील. असे या आढावा बैठकी दरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील म्हणाले मला महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या उपाध्यक्ष पदाची जी जबाबदारी सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या माध्यमातून समाजातील, गोरगरीब, कष्टकरी, उपेक्षित, वंचित, नागरीकांच्या अन्याय व समस्याला वाचा फोडण्याचे काम निपक्षपातीपणे आमच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष दहिदुले यांच्या माध्यमातून केले जाईल असे निवडी प्रसंगी बोलताना शिवाजी अप्पा पवार म्हणाले. शिवाजी पवार यांची शांत, सयंमी, धाडसी पत्रकार म्हणून इंदापूर तालुक्यात ओळख असून दै.जनप्रवास या वृत्तपत्राचे शिवाजी पवार इंदापूर तालुका प्रतिनिधी म्हणून सध्या कार्यरत आहेत.शिवाजी पवार यांनी सडेतोडपणे लिखाण करून अनेकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत






Vanchit News