Vanchit News

संविधान दिनाला गैरहजर असणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व ग्रामंचायत सदस्य यांच्या वरती कार्यवाही होणार का?



वंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप इंदापूर तालुक्यामध्ये संविधान दिन सर्वत्र साजरा.परंतु कार्यकर्ते,ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची अनुपस्थिती अनेक लोकांनी संविधान दिनाकडे फिरवली पाठ. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा भारत देश चालवायचा कसा असा प्रश्न ज्या वेळेस राजकीय नेत्यांपुढे पडला त्यावेळेस भारताला एकसंघ ठेवणार संविधान हे निर्माण केलं पाहिजे आणि याच संविधान निर्मितीची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचे अध्यक्ष करून सोपविण्यात आली. संविधान निर्मितीमध्ये अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.यामध्ये सर्व जाती-धर्माच्या नेत्यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली सर्व लोकांच्या विचारातून निर्माण झालेले हे भारतीय संविधान हे सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना सर्व पंथांना एकत्र बांधणारे व सर्व प्रांतांना एकत्र बांधणारे हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर 1949 रोजी भारताला सुपूर्द केले. या संविधानामध्ये आरक्षण या मुद्द्यावरती अनेक धोतक मार्ग चर्चा करण्यात आल्या आणि याच्यामध्ये मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रवर्ग निर्माण करण्यात आले आणि त्या प्रवर्गानुसार या ठिकाणी आरक्षण हे देण्यात आले, आज मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना जातीनुसार आरक्षण दिले जात नाही तर ते प्रवर्गानुसार दिले जाते असा प्रश्न संविधानाच्या चौकटीमध्ये निर्माण झाला आणि याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी कुणबी मराठा ओबीसी प्रवर्गामध्ये येतो तर कुणबी मराठ्याला आरक्षण दिले जावे अशा प्रकारची चर्चा झाली, परंतु अलीकडे काही लोकांचे संविधानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्यामुळे ,आजच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमास अनेक लोकांनी अनुपस्थिती दाखवली व संविधान दिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असेच चित्र सर्वत्र पहावयास मिळाले आहे. संविधानाचा अभ्यास नसल्यामुळे संविधान साक्षर होण्याची गरज आहे






Vanchit News