Vanchit News

**इंदापूर तालुक्यातील टनू गावात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन,* *वन विभागाच्या टीम ने ठाष्यांची केली पाहणी*



सह संपादक: श्री . सतीश जगताप इंदापूर तालुक्यातील ट नु या गावामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले, असून वन विभागाच्या टीमने रात्री उशिरा बिबट्या सदृश्यच प्राण्याचे ठसे असल्याचे सांगितले. काल सायंकाळी ठीक चार वाजण्याच्या सुमारास ट नु गावाच्या बाजूलाच महिला गु रे चार त असताना सदर प्राण्याचे दर्शन झाले, आरडाओरडा केल्यानंतर तो उसामध्ये पसार झाला. असे सदर महिलेने सांगीतले. याची खबर इंदापूर वन विभागाचे सूर्यवंशी साहेब ,व तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी व्ही .एम शेटे ए .एम हुकेरी ,बाळासाहेब वाघमोडे तलाठी बिराजदार पोलीस पाटील शरद जगदाळे नीरा भीमा कारखान्याचे संचालक प्रकाश मोहिते माजी सरपंच दादा पाटील माजी सरपंच राजाभाऊ मोहिते बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते व गावातील अनेक लोकांनी या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मदत करून ठ श्यांची स्थिती जाणून घेतल्यानंतर बिबट्या सदृश्य प्राण्याचेच ठसे आहेत असे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले व बिबट्या पासून बचाव कसा करावा याविषयीही माहिती दिली आवश्यकता वाटल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असेही आवाहन केले






Vanchit News