Vanchit News

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांचे मानधन व निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले.



वंचित न्यूज चॅनेल: पंढरपूर शहर प्रतिनिधी: सोमनाथ ठिगळे. दि. ४/१२/२०२३. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचेे राज्य अध्यक्ष दिलीप आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना दुसऱ्यांदा संध्याकाळी साडेसहा वाजता बार्शीचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन भवन सोलापूर येथे भेट घेतली असता चंद्रकांत दादा यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्या दोन दिवसात बार्शीच्या आमदारांना लक्षवेधी लावण्यास सांगितलेले आहे व पोलीस पाटलांचे विविध मागण्या आहेत त्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्राचे पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीप आबा पाटील, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी, राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख, पंढरपूर तालुकाध्यक्ष विजय वाघमारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष महादेव पाटील, अक्कलकोट तालुकाध्यक्ष्ष रहमान आत्तर, उत्तर सोलापूर बापू लवटे, पंढरपूर तालुका करकम विभाग प्रमुख नानासाहेब शिंदे, डॉ. शंकर भोसले बार्शी चंद्रकांत चौगुल आधी पोलीस पाटील उपस्थित होते.






Vanchit News