Vanchit News

*इंदापूर तालुक्यात दूध दरवाढी प्रश्नी दीपक अण्णा काटे शिवधर्म फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांचे आमरण उपोषण सुरू



*वंचित न्यूज चैनल* *सहसंपादक सतीश जगताप* दि.०५/१२/२०२३ इंदापूर तालुक्यातील तहसीलदार कचेरीच्या समोर शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांचे आमरण उपोषण सुरू असून राज्य शासनाने दूधदार निश्चितीमध्ये सहकारी संस्था व खाजगी संस्था यांच्यासाठी काढलेला जो जी.आर. आहे या जी.आर. मध्ये 34 रुपये प्रति लिटर हा दर निश्चित केलेला होता परंतु कोणत्याच सहकारी व खाजगी दूध संघाने हे निर्बंध पाळले नाहीत, व या ठिकाणी शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे, हाच प्रश्न धरून शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांनी इंदापूर तालुक्यातील युवकांना एकत्र करत मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा संकल्प केला असून आज दुसरा दिवस इंदापूर तहसील समोर त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. शासनाच्या जी.आर. ला न जुमान णाऱ्या सहकारी व खाजगी दूध संघांवरती कारवाई होईल का? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे याच प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सदर आंदोलन छेडले जात असल्याचे दीपक अण्णा काटे यांनी सांगितले






Vanchit News