Vanchit News





वंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप दि.२३/०१/२०२४ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरांमध्ये राम लल्लाची मिरवणूक व असंख्य महिला कडून दीप उत्सव साजरा करण्यात आला. अयोध्या या ठिकाणी रामरल्लाची प्राणप्रतिष्ठापना हा कार्यक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते अतिशय उल्हासात होत असतानाच यामध्ये सर्व भारतीयांनी सहभाग घेऊन अतिशय आनंदी वातावरणामध्ये हा सोहळा संपूर्ण भारतभर पार पडत असतानाच इंदापूर तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुरातील श्रीराम मंदिरामध्ये साफसफाई व स्वच्छता करण्यात आली तसेच त्याच ठिकाणाहून भव्य अशी मिरवणूक इंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणात होऊन नगरपरिषद प्रांगणामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली व त्या ठिकाणी असंख्य महिलांनी दीपप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा केला ,या सोहळ्यामध्ये ना. हर्षवर्धन पाटील व इंदापूर शहरातील सर्व पक्षातील कार्यकर्ते तसेच इंदापूर शहरवासीय व परिसरातील अनेक लोकांनी सहभाग नोंदविला, भव्य दिव्य असा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी नऊ वाजता इंदापूर शहरातील नारायणदास ,रामदास हायस्कूलच्या प्रांगणामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप दादा गारटकर व इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील कार सेवक, व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व असंख्य महिला व पत्रकार यांचीही हजेरी होती, शेवटी हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सर्व पत्रकार यांच्या समवेत महाप्रसाद हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतला रात्री उशिरा साडेअकरा नंतर सर्व कार्यक्रमाची सांगता झाली






Vanchit News